पंचवटी : पतीला गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी सासरच्यांकडून महिलेचा छळ करून घरातून हुसकावून दिल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.21 एप्रिल 2017 रोजी लग्न झाल्यानंतर फिर्यादी महिला सासरी नांदत असताना तिच्या सासरच्यांनी एक वर्ष चांगली वागणूक देऊन सन 2018 ते दि.6 जुलै 2024 पर्यंत तिच्या सासरच्या तीन महिला, दोन पुरुषांनी संगनमताने फिर्यादीचा मानसिक, शारीरिक छळ करून तुला घरकाम, स्वयंपाक येत नाही. तुझ्या आई व भावाने लग्नात मानपान दिला नाही. चैनीच्या वस्तू दिल्या नाही. पतीला गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे, या कारणावरून मारझोड करून बदनामी केली. लग्नात दिलेले दागिने काढून घेऊन घरातून हाकलून देऊन नांदविण्यास नकार दिला आहे. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक बी. बी. वाघ करीत आहेत