पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे… नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल

पत्नीला स्वर्गलोकी पाठवत मी पण जात आहे…
नाशिकरोडला निवृत्त मुख्याध्यापकाने उचलले टोकाचे पाऊल
नाशिकरोड : प्रतिनिधी

जेलरोड परिसरात निवृत्त मुख्याध्यापकाने आपल्या आजारी पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे या दांपत्यांचे दोन्ही मुले मुंबई येथे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की जेलरोड सावरकर नगर,एकदंत अपार्टमेंट येथील पहिल्या मजल्यावरील निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर रामचंद्र जोशी (वय 78) हे आपल्या निवृत्त शिक्षिका असलेल्या लता जोशी यांच्यासोबत राहत होते. त्यांची दोन मुले मुंबई येथे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करीत आहे. निवृत्त मुख्याध्यापक मुरलीधर जोशी यांच्या पत्नी लता यांना काही 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता, त्या काही दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. त्यातून त्या सावरल्यानंतर त्यांच्या आजारपणाला दोघे वृद्ध दांपत्य कंटाळले होते.संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी आपल्या पत्नी लताचा गळा दाबून तिचा तिला आजारपणापासून मुक्त केले तर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. हे करण्यापूर्वी निवृत्त मुख्याध्यापक जोशी यांनी चिठ्ठी लिहून माझ्या पत्नीला मी स्वर्गलोकी पाठवले व त्यानंतर मी तिच्यासोबत जात आहे.आमच्या मरणास कोणासही कारणीभूत ठरवू नये, असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती या दाम्पत्यांची कामे करणारी मोलकर्णीने समजल्यानंतर तिने आरडा ओरड केली. नागरिकांनी पोलिसांना घटनेबाबत कळविल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे , गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व पथक घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Gavkari Admin

Recent Posts

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

10 hours ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

2 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

2 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

2 days ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

2 days ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

2 days ago