महिला उमेदवारांच्या पाठिशी राहणार का महिला मतदारांचा आशीर्वाद ? नाशकात पाच तर दिंडोरीत दोन महिला उमेदवार रिंगणात

महिला उमेदवारांच्या पाठिशी राहणार का महिला मतदारांचा आशीर्वाद ?
नाशकात पाच तर दिंडोरीत दोन महिला उमेदवार रिंगणात

नाशिक: अश्‍विनी पांडे

जिल्हयातील नाशिक लोकसभा मतदार संघात पाच महिला उमेदवार तर दिंडोरी मतदार संघात  दोन महिला उमेदवार रिंगणात आहे.  नाशिक मतदार संघात   60. 75 टक्के मतदान झाले असून 5 लाख 60 हजार 770 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला तर दिंडोरीत दोन महिला उमेदवार रिंगणात असुन 66.75 टक्के मतदान झाले आहे. त्यात 5 लाख 57 हजार 777 महिलांनी मतदाना हक्क बजावला आहे. महिलांच्या मतदारांनी  उर्त्स्फुत प्रतिसाद दिला  आहे. महिलांच्या मतांवरच विजयी उमेदवार ठरणात आहे. त्यामुळे यंदा महिला  मतदार कोणाच्या पाठिशी अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान  सोमवार  दि. 20 मे  रोजी  झाले. अजून निवडणुकीचे दोन टप्पे   बाकी असून  4 जुन रोजी मतमोजणी होणार आहे. यंदा  लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रमुख पक्षांकडून 22 महिलांना  उमेदवारी देण्यात आली.  लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण आहे.  देशात 2019 च्या लोकसभा निवडणूकीत 78 महिला खासदार निवडणुन आल्या होत्या, त्यात महाराष्ट्रातून आठ खासदार  विजयी झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून किती महिला खासदार लोकसभेत जाणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नाशिक लोकसभा मतदार संघाची निर्मीती झाल्यानंतर अद्याप एकही महिला खासदार होऊ शकल्या नाहीत. तर अजूनही मोठ्या राजकीय पक्षांकडून नाशिक मतदार संघात खासदारकीची उमेदवारी महिलांना देण्यात आली नाही. तर दिंडोरी मतदार संघात 2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या डॉ.भारती पवार निवडणून आल्या होत्या तर यंदाही त्या लोकसभ निवडणूकीच्य रिंगणात आहेत.

गेल्या काही वर्षात राजकीय पक्षांकडून महिला उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. तसेच राजकारणातही महिलांचा सहभाग लक्षणिय वाढला  असून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. राजकीय वारसा असलेल्या महिलांसोबत सर्वसामान्य घरातील महिलांची राजकारणातला ओढा वाढत असलयाचे चित्र आहे. परिणामी लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत महिला उमेदवारांची संख्या प्रत्येक निवडणूकीत वाढत आहे.  महिलांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी महिला निवडणूक लढवत असताना महिला उमेदवारांच्या पाठिशी महिला मतदारांचा आशीर्वाद असणार का ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

मतदार संघात इतक्या महिलांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक मतदार संघात 9 लाख 70 हजार 996 महिला मतदार असून 5 लाख 60 हजार 770 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.  दिंडोरी मतदार संघात 8 लाख 93 हजार 38 महिला मतदार आहेत तर त्यापैकी 5 लाख 57 हजार 777 महिलांनी मतदान केले.

नाशिक लोकसभा   मतदार संघात
विधानसभा         एकूण महिला मतदार        झालेले मतदान
सिन्नर             145454                 95767
नाशिक पूर्व         187719                98416
नाशिक मध्य         160627                87777
नाशिक पश्‍चिम       210837                108749
देवळाली          132773                 77952
त्र्यंबेकश्‍वर          133586                92109
एकूण             970996                 560770

दिंडोरी लोकसभा   मतदार संघ
विधानसभा   एकूण महिला मतदार          झालेले मतदान
नांदगाव      158075                    86515
कळवण       144538                   97553
चांदवड       142660                   88039
येवला        150013                   90196
निफाड        141558                   83294
दिंडोरी        156194                   112180
एकूण         893038                   557777

 

नाशिक व दिंडोरीत इतक्या महिला उमेदवार रिंगणात

केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार या दुसर्यांदा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. तर दिंडोरी मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडूनही महिला उमेदवारांना संधी देण्यात आली असून मालती थवील या निवडणूक लढवत आहेत. नाशिक लोकसभा मतदार  संघात तुल्यबळ पुरूष उमेदवारांसमोर पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत. यात   सैनिक समाज पार्टीच्यावतीने  जयश्री पाटील,प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी  दर्शना मेढे, इंडियन पिपल्स अधिकार पार्टीकडून  भाग्यश्री अडसुळ, अपक्ष तिलोत्तमा जगताप,अपक्ष सुषमा गोराणे या निवडणूक लढवत आहेत.

राज्यात प्रमुख पक्षांनी दिलले इतके महिला उमेदवार
भाजपा – 6
शिवसेना ठाकरे गट -2
शिवसेना – 2
कॉग्रेस -4
राष्ट्रवादी कॉग्रेस  – 2
राष्ट्रवादी पवार गट – 1
वंचित बहुजन आघाडी- 5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *