ठाकरे गटात बदलाचे वारे,जिल्हाप्रमुखपदी डी.जी सूर्यवंशी
नाशिक : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटात भाकरी फिरविण्यात आली असून माजी नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याने तत्पूर्वी सूर्यवंशी यांची पक्षाने सूर्यवंशी यांची जिल्हाप्रमुख पदी निवड करून भाकरी फिरवली. दरम्यान आणखी देखील काही बदल पक्षांकडून केले जाणार आहे. शाखा प्रमुख ते नगरसेवक पदासह विविध महत्वाची पदे सूर्यवंशी यांनी भूषविली आहे.
….
पक्षांला घरघरारात घेऊन जाऊन पक्ष संघटन वाढवणे हे प्रमुख उदिष्ट आहे. आपण बाळासाहेबांचे कडवड शिवसैनिक आहोत. दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडू, तसेच पक्षासाठी जोमाने काम करू.
डी. जी सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख ठाकरे गट