खिळे ठोकल्याचे उघड; ‘अंनिस’कडून नागरिकांचे प्रबोधन
नाशिक : प्रतिनिधी
येथील तपोवन परिसरातील काही वृक्षांवर कथित जादूटोणा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याची महाराष्ट्र अंनिसने त्वरित दखल घेऊन या ठिकाणी प्रबोधन केले.
डिसेंबरमध्ये तपोवनातील काही वृक्षांवर अरबी भाषेतील काही चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन करत त्या काढून घेतल्या होत्या. असाच कथित जादूटोणा करण्याचा प्रकार तिथेच पुन्हा आढळून आला आहे. पर्यावरणवादी कार्यकर्ते अमित कुलकर्णी, राजू देसले, विशाल पाटील, प्रवीण शिलावट, संपत साळवे व इतर कार्यकर्ते वृक्षतोडीविरोधी आंदोलनात सक्रिय आहेत. वृक्षांची गणना करताना काही वृक्षांना काळ्या बाहुल्या, फोटो व बिबे खिळ्याने ठोकलेले त्यांना आढळले.
लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर व्हावी व वृक्षांची खिळ्यापासून सुटका व्हावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र अंनिसशी संपर्क केला. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते पक्कड, कात्री व इतर साहित्य घेऊन तपोवनात पोहोचले. त्यांनी सदर काळ्या बाहुल्या व बिबे वृक्षांपासून काढून टाकले. काळी जादू, करणी अथवा जादूटोणा असे काही प्रकारांचा मानवी जीवनावर काहीही बरा-वाईट परिणाम होत नाही. हे मांत्रिकांचे फसवणुकीचे प्रकार असून, नागरिकांनी त्यास घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले.
महाराष्ट्र सरकारने पारित केलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा असून, पोलिसांनी परिसरातील अशा मांत्रिकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. ‘अंनिस’ने हे कथित जादूटोण्याचे साहित्य काढल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ‘अंनिस’चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष आशा लांडगे, जिल्हा प्रधान सचिव नितीन बागूल, शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे आदी उपस्थित होते.
Witchcraft on the trees in the forest
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…