नाशिकरोड : प्रतिनिधी
वायफायच्या मदतीने फॉर्च्युनर कार चोरुन पलायन करणार्या एका संशयिताला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. सावळाराम बाबूलाल विषनोई (वय 25 रा,गालिफा, ता,संचोर,जि.जलोर ) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
दरम्यान नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे उप आयुक्त विजय खरात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ आदींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन केले आहे.
नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या पळसे येथील पांडुरंग संपत एखंडे 35 यांचे टोयोटा कंपनीची फॉर्च्युनर वाहन चोरीला गेल्याची तक्रार होती. त्यानुसार पोलीस तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित सदर वाहन धुळे मार्गे राजस्थानकडे जात असल्याची खबर मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर,सहा पोलीस निरीक्षक योगेश पाटील,जयेश गांगुर्डे,पोलीस कर्मचारी अविनाश देवरे,विष्णू गोसावी,मनोहर शिंदे आदींनी राजस्थान चितोडगड जवळ असलेल्या भांडरिया पुलाजवळ पोलीस नाकाबंदी करीत असतांना वाहन आढळून आल्याने नाशिकरोड पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून वाहन ताब्यात घेत संशयित सावळाराम बाबूलाल विषनोई याला बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यातील मुख्य संशयित मुकेश खिलेरी, सुरेश खिलेरी यांचा पोलीस शोध घेत आहेत. हे वाहन वायफायच्या सहाय्याने चालू करून चोरी केल्याचे तपासात समोर झाले आहेत.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…