ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-देवळाली गावात सर्वपक्षीय शिवजयंती समितीच्या बैठकीत हिशेब मागितल्याच्या कारणावरून काही दिवसांनी माजी नगरसेवक भय्या मणियार, सागर कोकणेंसह तिघांविरुद्ध पालकमंत्र्यांच्या दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी गंगाथरन डी.यांना देण्यात आले.
देवळाली गावात झालेल्या सर्वपक्षीय शिवजयंती समितीच्या बैठकीत माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्याकडे मागील वर्षाचा हिशेब मागितला असता, त्याचा राग येऊन लवटे यांनी सागर कोकणे व त्यांच्या कार्यकर्त्यांशी नाहक वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी स्वप्निल लवटे यांनी सागर कोकणे यांच्या दिशेने गोळीबार करीत जीवे मारण्याची धमकीही दिली.लवटे व त्यांच्या साथीदारांकडे घातक शस्त्रेही होती.या सर्व घटनेची सत्य माहिती उपनगर पोलिसांनी घेतली व नंतर स्वप्निल लवटेला अटकही झाली.या संपूर्ण घटनेचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद आहेत.असे असतांनाही या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलिसांनी ज्यांनी तक्रार केली ते सागर कोकणे, भैय्या मणियार,प्रशांत जाधव यांच्यावर खोटेनाटे आरोप करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांचे हे कृत्य निषेधार्ह आहे. कोणतेही पुरावे नसताना केवळ पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिस हे सर्व उद्योग करीत असल्याचा आम्हाला दाट संशय असून या संपूर्ण प्रकरणाचे वरिष्ठांनी कसून चौकशी करावी आणि कोकणे,मणियार,जाधव,यांच्याविरु द्धचे खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत,अशी आमची कळकळीची विनंती आहे,असे निवेदनात नमूद करण्यात असले आहे. दाखल केलेले खोटे गुन्हे मागे नघेतल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे नाशिकच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्यात येईल. याची आपण गांभिर्यपूर्वक दखल घ्यावी. माजी मंत्री बबनराव घोलप,उपनेते सुनील बागूल,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,माजी गटनेते विलास शिंदे,आ.नरेंद्र दराडे,माजी आमदार योगेश घोलप,बाळासाहेब कोकणे, महेश बडवे,बाळा दराडे आदीं उपस्थित होते.