सिडको : विशेष प्रतिनिधी
ठक्कर बझार बसस्थानकात महिला प्रवाशांचे दागिने व रोख रक्कम चोरी करणार्या महिलेला गुन्हे शाखा अंबड युनिटने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे चार लाख 45 हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
दि. 30 डिसेंबर 2025 रोजी दिंडोरी येथील रहिवासी अमित अशोक वाघमारे हे पत्नी व मुलांसह ठक्कर बझार स्थानकातून बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा अंबड युनिटने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. दि. 4 जानेवारी 2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक महिला चोरीचे दागिने विक्रीसाठी पंचवटी परिसरात फिरत आहे. या माहितीनुसार गणेशवाडी फुलबाजार परिसरात सापळा रचून निर्मला विजय लोंढे (वय 37, रा. तिरुपतीनगर, टाकळी रोड, नाशिक; मूळ रा. जाजूवाडी कॅम्प, मालेगाव) हिला ताब्यात घेण्यात आले.
तिच्या अंगझडतीत एक मंगळसूत्र, टॉप्सची जोडी, नेकलेस व कानवेल, असा एकूण चार लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत तिने ठक्कर बझार स्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेची पर्स चोरी केल्याची कबुली दिली.
या तपासात हीच चोरी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात घेतलेल्या महिलेला पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा अंबड युनिटच्या पथकाने केली.
Woman arrested for stealing jewellery at Thakkar Bazaar bus stand
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…