महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
लासलगाव प्रतिनिधी
लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एरिगेशन कॉलनी कॉलेज रोड पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या एका महिलेने स्वत:च्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव ग्रामपंचायत मध्ये शिपाई असलेल्या कविता भागवत गरड वय ३३ वर्ष या महिलेने तिच्या राहत्या घराच्या छताला साडीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची माहिती मयत कविता ची बहीण निशा किरण गरड हिने लासलगाव पोलिस ठाण्यात दिली या माहितीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक घोलप करत आहे.मयत कविता हीचे पती देखील लासलगाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा विभागात कर्मचारी होते,त्यांचा देखील दोन वर्षापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता.मयत कविताच्या पश्चात दोन लहान मुले व एक लहान मुलगी आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.