धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सिडको : विशेष प्रतिनिधी
शहरातील उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून नामांकित असलेल्या गंगापूर रोडवरील वृक्षांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास गंगापूररोडवरून शिवाजीनगरकडे येत असताना सोमेश्वर बसथांबा येथे वृक्षाची फांदी अंगावर पडल्याने महिलेला प्राण गमवावे लागण्याची घटना उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक अनिल सोनवणे हे आईसमवेत गंगापूररोडवरून शिवाजीनगरकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी दीपक व त्यांची आई अलका अनिल सोनवणे (वय 55 वर्ष) यांच्या अंगावर अचानक वृक्षाची फांदी कोसळली. यावेळी अलका यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना औषधोपचाराकरिता संदीप नवले यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉ. शिंदे यांनी अलका सोनवणे यांनी तपासून मयत घोषित केले. तसेच दीपक सोनवणे यांना देखील गंभीर मार लागला असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गंगापूर रोडवरील रस्त्यात येणारे वृक्ष व वृक्षांच्या विस्तारलेल्या फांद्या याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाने लक्ष घालून नागरिकांचे प्राण जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विस्तारलेल्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी करण्यात आली. घटनेनंतर उद्यान विभागाने तात्काळ सोमेश्वर बसथांबा परिसरातील विस्तारलेल्या वृक्षांच्या फांद्या छाटल्या.
गंगापूर रोड, पेठ रोड, दिंडोरी रस्त्याला धोकेदायक झाडे
गंगापूर रोड, पेठ रोड, दिंडोरी रोड यांसह शहरातील बहुतांशी ठिकाणी रस्त्याच्या कडेला धोकेदायक झाडे आहेत. या झाडांमुळे अनेकवेळा छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनादेखील घडल्या आहेत. हे सर्वश्रुत असतानाही मनपाच्या उद्यान विभागाने हे धोकेदायक झाडे हटविणे उचित असतानाही संबंधित विभागाकडून दुर्लक्षित केले जात आहे. गंगापूर रोडवरील घटनेनंतरही पालिका प्रशासनाला जाग येत नसेल तर पालिका प्रशासन अजून काही नागरिकांचा बळी जाण्याची वाट बघणार आहे का? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…
8 लाख 75 हजार 912 शेतकर्यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…
दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…
नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…
उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…