महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी लाच घेताना जाळ्यात
मागितली तब्बल इतकी लाच
नाशिक : प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना54 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले, शुभांगी बनसोडे असे या अधिकारी महिलेचं नाव आहे. तक्रारदार या धुळे येथील एकात्मिक बाल विकास कार्यालयात पर्यवेक्षक आहेत,तक्रारदार व त्यांच्या कार्यालयातील सहकारी कर्मचारी प्रवास भत्याची 9 लाख 37 हजार 533 रुपयांची देयके संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याच्या मोबदल्यात दहा टक्के प्रमाणे 93 हजार रुपये लाच शुभांगी बनसोडे यांनी मागितली होती. यापैकी पहिला हफ्ता 54 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यासाठी पथकाने सापळा रचला होता. पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, पोलीस शिपाई प्रशांत बागूल, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने पिंपळनेर येथे रंगेहाथ पकडले. याबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अधीक्षक शर्मिष्ठा घारगे,वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक अभिषेक पाटील, नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…