नाशिक

पाणीप्रश्नावरून प्रधान सचिवांसमोर महिलांनी वाचला समस्यांचा पाढा

प्रभागरचनेच्या सुनावणीत काही वेळ गोंधळ

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेत प्रभागरचनेवर पाणीपुरवठा विभागाचे प्रभाग सचिव संजय खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनावणी झाली. दरम्यान, सुनावणी सुरू असतानाच महिलांनी पाणीप्रश्नावरून काहीसा गोंधळ उडाल्याची परिस्थिती उद्भवली.
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शासनाच्या आदेशावरून महापालिकेकडून शहरातील प्रारूप प्रभागरचना जाहीर करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. यासंदर्भातील मंगळवारी मनपा मुख्यालयात सुनावणी झाली. दरम्यान, प्रभाग 22, 31 याबाबत सुनावणी झाल्यावर पिंपळगाव खांब भागातील महिलांनी एकत्र येत खंदारे यांच्यासमोरच आपल्या भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली. आमच्या भागात पाणीप्रश्न गंभीर झाला असून, पाणी पुरेसे येत नाही व कमी दाबाने येते, अशी तक्रार केली. यामुळे सुनावणीचा मुद्दा सोडून वेगळ्याच कारणाने ही बैठक चर्चेत आली. यावेळी खंदारे यांनी मनपा अधिकार्‍यांकडे पाहत या महिलांच्या तक्रारींची दखल घ्या, अशी सूचना केली. यावेळी महापालिका आयुक्त मनीषा खत्रीदेखील उपस्थित होत्या. महिलांनी आपल्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत मागणी केली. दरम्यान, सुनावणीच्या कामात कुठलाही व्यत्यय नको म्हणून महिला पोलिसांनी पुढे येऊन महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शहरात पाणीप्रश्न गाजत असून, पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास होतो आहे. मंगळवारी सुनावणीसाठी शासनाचे पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव येत असल्याने त्यांच्या दरबारी महिलांनी पाण्याची समस्या मांडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

प्रभागरचनेवर तीन तासांत सुनावणी

91 हरकतींद्वारे नागरिकांच्या सूचना

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (दि. 9) पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मनपा आयुक्त मनीषा खत्री, प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली. अवघ्या तीन तासांत आलेल्या हरकतींचा निपटारा करण्यात आला.
शहर अभियंता संजय अग्रवाल, नगररचना उपसंचालक दीपक वराडे, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, नितीन पाटील, रवींद्र बागूल, रवि पाटील, नवनीत भामरे उपस्थित होते. यावेळी सारख्या हरकती असणारे 24 गट करण्यात आले होते. नियोजित मुदतीत 6 विभागीय कार्यालये तसेच मनपा मुख्यालय येथे प्राप्त झालेल्या एकूण 91 हरकती व सूचना यावर सदर सुनावणी घेण्यात आली. एकाच प्रभागाबाबत अनेक जणांनी हरकती दाखल केल्याने हरकतींमधील साम्य लक्षात घेऊन खंदारे यांनी 24 गटांत 91 हरकतदारांचे म्हणणे ऐकून घेतले.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे हे 91 हरकतींचा अहवाल अभ्यास करून शासनाकडे पाठविणार असून, प्रभागरचनेची अंतिम यादी 13 ते 15 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात
येणार आहे.

प्रभागरचनेबाबत ज्या नागरिकांच्या लेखी हरकती, सूचना होत्या, त्यांना नेमून दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी आपल्या हरकती व सूचना विस्तृतपणे मांडल्या. यावर अभ्यास करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.
-संजय खंदारे, प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago