लासलगाव:समीर पठाण
लासलगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या साडीच्या दुकानात साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी दुकानदाराचे लक्ष विचलित करून अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये किमतीच्या साड्या चोरून नेल्याची घटना घडली.सदर घटना दुकानात असलेल्या सीटीव्हीत कैद झाल्यामुळे आपल्या दुकानात साड्यांची चोरी झाल्याचे दुकानदाराच्या लक्षात आले
महिलांना साड्यांची आवड किती असते हे खरं तर सांगण्याची गरज नाही पण याच हौसेपोटी महीला कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय लासलगाव शहरातील गजबजलेल्या ठिकाणी टिळक रोड येथे असलेल्या दिनेश प्रजापती यांच्या आशापुरा साडी सेंटर येथे आला.दोन महिला साड्या घेण्याच्या बहाण्याने या आशापुरा साडी सेंटर या दुकानात शिरल्या आणि त्यांनी दुकानातील माणसांना साडी दाखवण्यात गुंतवून ठेवलं आणि त्यानंतर या दोन महिलांनी हातचलाखी करून साड्या चोरून त्या आपल्या नेसलेल्या साडीत टाकून तिथून पोबारा केला.
साड्यांची चोरी झाल्याचा प्रकार दुकानदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लासलगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस तातडीने घटनस्थळी दाखल झाले व सीसीटिव्ही फुटेज च्या आधारे या महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करून या पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…