नाशिक

द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू

नाशिक : प्रतिनिधी
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील द्वारका सर्कल येथील सतत होणार्‍या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा नाशिकमधील अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांत जास्त वर्दळ असणारा चौक असल्याने येथे होणार्‍या वाहतूक कोंडीचा नाशिककरांना खूप त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
तसेच येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्यात यावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ नाशिक महानगरपालिका, नाशिक शहर वाहतूक पोलिस व राष्ट्रीय महामार्ग विभागाला केलेल्या होत्या व यासाठी बैठक घेतलेली होती तसेच पत्रव्यवहारही केलेला होता. त्यांच्या या पाठपुराव्यातून अखेर हे काम सुरू झाले असून, लवकरच या ठिकाणी एक सुनियोजित वाहतूक व्यवस्था उभारण्यात येऊन वाहतूक कोंडीमधून नाशिककरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago