सिडको : दिलीपराज सोनार
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई महामार्गावर असलेल्या गरवारे हाऊसच्या पाठीमागे एका ३४ वर्षीय बिगारी कामगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष काळे (वय ३४, रा. लेखानगर झोपडपट्टी, जुने सिडको, नाशिक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.