नाशिक

मतदानासाठी कामगारांना मिळणार भरपगारी सुट्टी

नाशिक : प्रतिनिधी
नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक- 2025 साठी आज (दि. 2) जिल्ह्यात मतदान होणार आहे. मतदारांना निश्चितपणे मतदान करता यावे यासाठी खाजगी आस्थापनांतील सर्व कामगार, कर्मचारी व अधिकार्‍यांना भरपगारी सुट्टी देण्यात आल्याची माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 28 नोव्हेंबरच्या शासन परिपत्रकानुसार ही सुट्टी देणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे.
दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, नाट्यगृहे, कारखाने आदी सर्व आस्थापनांना हा निर्णय लागू राहणार आहे. मतदानाच्या दिवशी कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर असले, तरी संबंधित कामगारांचा मतदार म्हणून समावेश असल्यास त्यांना सुट्टी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान दोन ते तीन तासांची मतदानासाठी सवलत देता येईल. मात्र, त्यासाठी महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकार्‍यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी आवश्यक वेळ दिला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी दि. त्र्य. पाटोळे, तु. गं. बोरसे, नि. रं. खैरनार आणि यो. मा. जाधव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे माळी यांनी कळविले आहे.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गावकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, 1 वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago