जागतिक सायकल दिनानिमित्त ‘सायक्लोथॉन’

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन, मानवता कॅन्सर सेंटर व नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिनानिमित्त रॅली आयोजित करण्यात आली. रामवाडी पुलाजवळील गोदापार्क येथे सर्व सायकलिस्ट एकत्र आले होते.
स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी स्मार्ट सिटीसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ. राज नगरकर यांनी तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी जागतिक सायकल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. येत्या 1, 2, 3 जुलै रोजी नियोजित पंढरपूर सायकलवारीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सेक्रेटरी सचिव डॉ. मनीषा रौंदळ यांनी तंबाखूमुक्ती व स्वच्छतेची सर्व उपस्थितांना शपथ दिली.
जागतिक सायकल दिनानिमित्त स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलिस्टसच्या सेफ्टीसाठी सायकलच्या मागील लाईट व मोबाइल होल्डर भेट देण्यात आले. सकाळी गोदापार्क स्मार्ट सिटी प्रकल्प रामवाडी येथून राइडचा प्रारंभ झाला. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उत्तर महाराष्ट्रातील प्रख्यात कॅन्सर सर्जन डॉ. राज नगरकर, नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, उपाध्यक्ष किशोर माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीचा मार्ग, गोदा पार्क (स्मार्ट सिटी) – रामवाडी पूल-अशोक स्तंभ-जुना गंगापूर नाका-राजीव गांधी भवन- सीबीएस – गडकरी चौक- मुंबई नाका – मानवता कॅन्सर सेंटर असा होता. सर्वांच्या सायकलला तंबाखूविरोधी संदेश देणारे बोर्ड लावण्यात आले होते. ‘स्वच्छ व सुंदर नागरिक, नाशिक आपली जबाबदारी’, ‘तंबाखू सोडा, सायकल चालवा’, ‘तंबाखू सोडा, आरोग्य वाढवा’ या घोषणा देत रॅलीद्वारे जनजागृती केली. अतिशय शिस्तबद्ध अशी ही राइड सर्व नाशिककरांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. या राइडची सांगता मानवता कॅन्सर सेंटर येथे झाली. जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित केलेल्या
स्पर्धेत आकर्षक सायकल सजावटमध्ये प्रियंका देशमुख, प्रवीण खोडे, योगिता बारसे यांना विजयी घोषित केले. तंबाखू सेवन दुष्परिणामाविषयी स्लोगन
स्पर्धेत कल्पना कुशारे, किरणकुमार माळी, यशवंत दुसाने हे बक्षिसास पात्र ठरले. परीक्षक म्हणून संजय पवार व किशोर शिरसाठ यांनी भूमिका पार पाडली. मानवता कॅन्सर सेंटरतर्फे सर्व विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे हे शहरात सायकल चळवळ मोठ्या जोमाने राबवत आहेत. त्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या रॅलीच्या आयोजन व नियोजनासाठी उत्कृष्टरीत्या काम केल्याबद्दल खजिनदार रवींद्र दुसाने व सचिव डॉ. मनीषा रौंदळ यांना सन्मानित केले. ही रॅली यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मानवता कॅन्सर सेंटरचे मार्केटिंग मॅनेजर अनिरुद्ध शेंडे, मीताली व मंजुषा पाटील यांनी परिश्रम घेतले. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट डेप्युटी जनरल मॅनेजर सुधीर गोराडे, अर्बन प्लॅनर माधुरी जावळे, नीलेश बर्डे व टीमचे सहकार्य लाभले. नाशिक सायकलिस्टसच्या माधुरी गडाख, जाकीरभाई पठाण व डॉ. नितीन रौंदळ यांनी स्वयंसेवकांची भूमिका निभावली. या रॅलीमध्ये 170 सायकलिस्टने सहभाग नोंदवला. सहभागी सायकलिस्टला सर्टिफिकेट व कॅप देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक राष्ट्रगीताने झाली.

Bhagwat Udavant

Recent Posts

घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले, नंतर बायको- सासूलाही पेटवले

  घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही...     नाशिक: …

5 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

  काँग्रेस  मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…

8 hours ago

अभोण्यात कांदा आवक घटली

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्‍यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…

8 hours ago

नाशकातील शिवसैनिक जागेवरच : खा.संजय राऊत

नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…

8 hours ago

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात 39 हजार मतदारांची वाढ

नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…

8 hours ago

भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव

नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…

9 hours ago