उत्तर महाराष्ट्र

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक रेड क्रॉस आणि श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यस्तरीय पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा शालेय गट व 11 वी च्या पुढे खुला गट अशा दोन गटात होईल. यंदाच्या आपली पृथ्वी आपले आरोग्य अर्थात आपली हवा, पाणी व अन्न स्वच्छ ठेवा किंवा आरोग्याशी संबंधित कोणतेही पैलू दाखवणारे पोस्टर माउंटबोर्ड वर रेखाटून पाठवायचे आहे.  किमान आकार 15 इंच बाय 20 इंच असावा.
स्पर्धेत सहभागी सर्वांना ई प्रमाणपत्रे देण्यात येणार असून विजेत्यांना अत्यंत आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येतील. आपली पोस्टर्स सोमवार दि.4 एप्रिल पर्यंत पोस्टाने, कुरियरने ,समक्ष पुढील पत्त्यावर पोहोचायला हवीत.- इंडियन रेड क्रॉस सोसायटी, रेड क्रॉस हॉल,  टिळक पथ,  नाशिक – 422001.
पाठवण्यापूर्वी पोस्टर चा मोबाईल वर फोटो काढून 9422248380  या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारा पाठवावा.
स्पर्धेच्या व विषयाच्या अधिक माहितीसाठी 9422248380 या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन रेडक्रॉस सचिव मेजर पी.एम. भगत , श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ.पल्लवी धर्माधिकारी , स्पर्धा संयोजिका   डॉ. प्रतिभा औंधकर , ईपका लॅबोरेटरीज तसेच रेडक्रॉस कार्यकारिणी ने केले आहे.

Team Gavkari

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago