नाशिकला होणार विश्व मराठी संमेलन
नाशिक : प्रतिनिधी
विश्व मराठी संमेलन यंदा डिसेंबर महिन्यात नाशिकला होणार आहे.अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी आज बैठकीत सांगितले, नाशिकला यापूर्वी साहित्य संमेलन झाले आहे, विश्व मराठी संमेलन होणार असल्याने नाशिकची ओळख आता जागतिक पातळीवर पोचणार आहे, नाशिकला होणारे हे चौथे संमेलन असून या आधीचे दोन संमेलन मुंबईत व एक पुण्यात झाले आहे. या संमेलनासाठी जगभरातून साहित्यिक सहभागी होणार आहेत.