नाशिक ः गरुडझेप प्रतिष्ठानने गडकोट संवर्धन, गोदावरी स्वच्छता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान व वाहतूक सुरक्षा, पर्यावरण रक्षा अभियान गेली 2600 दिवस सातत्यपूर्ण राबवत नवीन जागतिक विक्रम केला आहे. 25 मार्च 2018 पासून सातत्यपूर्ण हे अभियान सुरू आहे. याचे 20 जागतिक विक्रम झाले आहेत. रायझिंग स्टार इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, ब्राहो इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यात नोंद झाली आहे. गेली सात वर्षे गरुडझेपचे कार्यकर्ते संगीता भानोसे, संकेत भानोसे, अविनाश क्षीरसागर, अजिंक्य तरटे, सागर बोडके, अंजली प्रधान, रेणू भानोसे अभियान यशस्वीरीत्या राबवत आहेत. गरुडझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप भानोसे, संगीता भानोसे, रेणू भानोसे, अंजना प्रधान, सुनील पवार, सौमित्र धुमाळ, संकेत भानोसे, अमोल अहिरे, प्रियंका अहिरे, राम व आराध्य अहिरे, रॉयल रायडर्स नाशिकरोडचे अध्यक्ष राजू रूपवते व नाशिकचे सायकलप्रेमी किशोर माने, नलिनी कड, सुवर्णा देशमुख, मंदा येवले, सूर्यकांत आहेर, विनायक वारुंगसे व इतर यांंच्यासोबत अभियान यशस्वीरीत्या राबविले. पुढील टार्गेट सातत्यपूर्ण तीन हजार दिवस, असे गरुडझेपचे अध्यक्ष संदीप भानोसे यांनी जाहीर केले.