म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त दोन दिवसीय कुस्त्यांची दंगल

सिडको ः विशेष प्रतिनिधी

उंटवाडी येथील नंदिनी नदीच्या तीरावर असलेल्या आणि गर्द हिरव्या महाकाय वटवृक्षाच्या छायेत स्वयंभू उंटवाडीचा राजा अतिप्राचीन म्हसोबा महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल भरविण्यात आली. यावेळी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील महिला आणि पुरुष पैलवान कुस्ती आखाड्यात उतरले होते. श्री म्हसोबा महाराज देवस्थान समितीच्या माध्यमातून पूर्वापार चालत असलेल्या या यात्रेच्या समाप्तीनिमित्त अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने कुस्त्यांची दंगल भरविण्याची परंपरा कायम ठेवत यंदाही कुस्तीप्रेमींसाठी अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रा कमेटीच्या वतीने सिटी सेंटर मॉलनजीक महाकाय आणि विशाल वटवृक्षाच्या छायेखाली अतिप्राचीन म्हसोबा महाराज मंदिरच्या प्रांगणात कुस्त्यांची दंगल भरविण्यात आली या कुस्त्यांच्या दंगलीत भगुर येथील बलकवडे व्यायामशाळा,दांडेकर तालीम, यासह नाशिक शहर आणि जिल्ह्यातील विविध व्यायामशाळेतील मातब्बर पैलावांनासह चिंचोली, मुरंबी,विल्होळी वाडीवर्‍हे इगतपुरी येथील पट्टीचे पैलवानांनी कुस्तीच्याआखाड्यात उतरुन कुस्त्यांची परंपरा कायम आहे. यावेळी कुस्तीगीरांसह पैलवान तसेच कुस्तीप्रेमींनी मोठीगर्दी केली होती. प्रारंभी अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यात्रा पंच कमेटीचे अध्यक्ष फकिरराव तिडके, माजी नगरसेवक आण्णा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्त्यांच्या दंगलीला प्रारंभ करण्यात आला यावेळी अतिप्राचीन म्हसोबा महाराज यात्रा कमेटीचे ,माजी अध्यक्ष मधुकर तिडके यांच्यासह सदाशिव नाईक, अंबादास जगताप, रामचंद्र तिडके ,बाजीराव तिडके,आण्णा पाटील,दत्ता पाटील विलास जगताप, विष्णु जगताप, एकनाथ तिडके, जगन्नाथ तिडके, राजेश गाढवे, सुरेश जगताप, संतोष कोठावळे बाळासाहेब तिडके, राम पाटील,प्रविण जगताप , दत्तात्रेय तिडके, आदीनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *