वर्धापनदिन विशेष
-सुनील शिरवाडकर
9423968308
नाशिकमध्ये एक प्रथा आहे. कोणताही सामाजिक कार्यक्रम असो… किंवा नाशिकबद्दल काही लिहायचे असो….सुरुवातीला एक वाक्य घेणं बहुधा बंधनकारक आहे. ते वाक्य म्हणजे… ‘प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत…’ अशी सुरुवात करायची… आणि मग पुढचं काय ते भाषण करायचं, लेख असेल तर तो लिहायचा…
खरंच आम्हा नाशिककरांना प्रभू रामचंद्रांचा.. पंचवटीचा.. गोदेचा फार अभिमान. असं म्हणतात.. कधी काळी येथे फक्त दंडकारण्य होतं. म्हणजे फक्त जंगलच. मग रामाच्या वास्तव्याने.. रामाच्या परीसस्पर्शाने या मुलीचं भाग्य उजाडलं.हळूहळू गाव वसलं. कित्येक शतके तर नाशिकची ओळख केवळ गाव म्हणुनच होती.नुसतं गाव नाही तर मटा भिक्षुकांचं गाव. व्हिक्टोरीया पुलापासून तर टाळकुटेश्वर पुलापर्यंत गोदावरीच्या दोन्ही किनार्यावर वसलेलं गाव. नदीच्या दोन्ही तीरावर फार कमी गावं वसलेली आहेत. बहुधा नदीच्या एकाच बाजूला गावं वसलेली असतात.तर दोन्ही बाजुला वसलेलं हे नाशिक.अलीकडे नाशिक.. आणि पलीकडे पंचवटी.गोदावरीच्या दोन्ही तीरावर असंख्य मंदिरे.एकूणच गोदावरीच्या तीरावर शिवालयांची संख्या अधिक.जसं क्रुष्णा नदीच्या तीरावर दत्तस्थाने दिसतात..तशी गोदावरीच्या काठी शंकराची मंदिरे अधिक दिसतात. या मंदिरांमध्ये पहाटे होणार्या काकड आरतीने गाव जागे होईल.पंचवटीतील काही भाग..तसेच सोमवार पेठ,तिवंधा,मधली होळी..या भागांमध्ये पुजा पाठ करणार्या ब्राम्हणांचे वाडे.पहाटे ऊठुन ते रामकुंडाची वाट धरायचे. पाठीवर नामावळ्यांचे गठ्ठे. काहीजण थेट नाशिकरोड स्टेशन वर जात. पुजाविधी करण्यासाठी बाहेर गावाहुन जे यजमान येणार असतं..त्यांना आणण्यासाठी.नाशिकची बरीचशी अर्थव्यवस्था या व्यवसायावरच चालत होती.गंगेवरचे धार्मिक क्रियाकर्म..उत्तरकार्य..गंगापुजन असे विधी पार पडले की मग गाव जरा निवांत होई.संध्याकाळी वेगवेगळ्या मंदिरांमधुन होणार्या आरत्यांनी पुन्हा गोदाकाठ गजबजून जाई.विविध मंदिरांमधुन किर्तनाचे,प्रवचनाचे कार्यक्रम असत.नामवंत किर्तनकार नाशिकला येत.वेगवेगळे नामसप्ताह सुरु असतं.एक वेगळाच भक्तीदरवळ त्याकाळी नाशकात होता.कोणत्याही कार्यक्रमांना श्रोत्यांची कमी कधी पडली नाही. अशीही काही वर्षे लोटली.नाशिकरोडला करन्सी नोट प्रेस सुरु झाला.त्यानंतर नाशिकची वाढ एका शहराच्या दिशेने चालू झाली.लोकांना रोजगाराची नवनवीन साधने निर्माण झाली.भद्रकाली पासुन नाशिकरोड स्टेशन पर्यंत सिटी बसेस सुरू झाल्या. टॅक्सीदेखील सुरु झाल्या. दुमजली बसच्या वरच्या डेकवर..फ्रंट सीटवर बसुन प्रवास करणं हे एक आकर्षणच होतं.तसे गावातल्या गावात फिरण्यासाठी टांगे होतेच.कुठेतरी एखादी तुरळक रिक्षा दिसायची तेवढीच. 1970-75 च्या काळात सातपुरला औद्योगिक वसाहत सुरु झाली.. आणि औद्योगिक शहर ही नाशिकची नवीन ओळख निर्माण झाली.त्याकाळात नाशिक दोन भागात विभागले गेले होते ्गंगेपासुन जुना आग्रा रोड पर्यंतचा एक भाग.. आणि त्यापलीकडे दुसरा भाग.जुन्या भागात अजुनही गावपण टिकुन होतं.हॉटेल संस्कृती उदयाला येत होती.इतकी वर्षे बाहेर खाणं म्हणजे काहीतरी वाईट असाच समज होता.फारतर चहा वगैरे इतपतच.पण दही पुलावरील कमला विजय.. आणि मेन रोडवर भगवंतराव यांनी नाशिकला मिसळीचा पाया रचला.आज नाशिकला जो मिसळीची राजधानी म्हणून मान आहे त्याची सुरुवात या दोन हॉटेल्सनी झाली आहे.कॉलेज तरुणांमध्ये मात्र महाराजच्या मिसळची क्रेझ होती.मेनरोडला चित्रमंदिर थिएटर जवळ ही झणझणीत मिसळ ची गाडी होती.मेन रोड हा अजुनही मेन रोडच.. म्हणजे मुख्य रस्ता होता.या रस्त्यावर काय नव्हतं? थिएटर्स होते..कपडे, साड्या,पुस्तके्, इलेक्ट्रीकल,सायकली, हार्डवेअर,रंगाची दुकाने्..इतकंच नव्हे तर फोटोग्राफर.. इंजिनीअर.. आर्किटेक्ट..यांची ऑफिसेस.. डॉक्टर.. सगळं काही मेनरोडवरच्पुढे रविवार कारंजा वर यशवंत मंडई उभी राहीली.हा पहीला कमर्शियल कॉम्प्लेक्स.तीन बाजुंनी दुकानं आणि वरती नामांकित डॉक्टरांचे दवाखाने.सगळेच जण स्पेशालिस्ट.त्यात डोळ्यांचे डॉक्टर होते.. अस्थिरोग तज्ज्ञ होते.. दंतवैद्य होते.. स्त्रीरोगतज्ज्ञ होते.
मेन रोड, शिवाजी रोड,एम.जी्.रोड ही बाजारपेठेची हद्द.श्रीराम वाडी, वकील वाडी,गोळे कॉलनी ह्या भागात उच्चभ्रू,श्रीमंतांचे बंगले.1990 नंतर मात्र नाशिकच्या वाढीसाठी अफाट हाच शब्द योग्य ठरेल.मुख्य बाजारपेठ कॉलेजरोड, गंगापुर रोडवर जाऊनही बराच काळ लोटला.सिटीलींकच्या बसेसनी तीस किमी परीघातली गावे नाशिक शहरात समाविष्ट झाली.सातपुर,अंबरच्या औद्योगिक वसाहती गोंदे, सिन्नर, दिंडोरी पर्यंत पोहोचल्या. शहराच्या सगळ्याच उपनगरांमध्ये बाजारपेठा उभ्या राहिल्या.
’मंत्रभुमीकडुन यंत्रभुमीकडे वाटचाल करणारे शहर ’ म्हणून नाशिकची ओळख आजकाल केली जाते.याच यंत्रभुमीतला नाशिककराचे पाय सणवार सुरू झाले की घाटाकडे वळतात. गणपती, नवरात्र, दिवाळी या सणांना भद्रकाली, शालीमार, रविवार कारंजा,दहीपुल या भागात होणारी गर्दी पाहीली की समजतं.. जुन्या नाशिकचं महत्त्व हे अबाधित रहाणार आहे.या भागात येऊन खरेदी केल्या शिवाय नाशिककरांचे सण साजरे होतच नाही.रामनवमीच्या उत्सवात ते काळाराम मंदिरात जाणारच..रथयात्रेला हजेरी लावणारा..रंगपंचमीला डिजेच्या तालावर नाचण्यासाठी..रहाडीत उडी मारण्यासाठी तो जुन्या नाशिकच्या गल्लीबोळातून फिरणारच.. आणि दिवाळी साजरी झाली की त्रिपुरी पौर्णिमेला रामकुंडात आपली एक पणती सोडण्यासाठी..घाटावरचा घंटानाद ऐकण्यासाठी गंगेला जातोच जातो.
नाशिक: प्रतिनिधी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचा आज होणारा दौरा रद्द झाला आहे. जिल्हाधिकारी…
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झालं आहे. श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास…
शिंदे टोलनाक्यावर कारला आग शिंदे:प्रतिनिधी शिंदे टोल नाक्यावर सुमारे साडेसात वाजेच्या दरम्यान सिन्नर कडुन नाशिक…
नाशिक: महापालिका आयुक्त पदाबाबत मोठी घडामोड पहावयास मिळत आहे, वादग्रस्त आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय…
दिंडोरीत बनावट नोटा व प्रिंटर जप्त तिघांना अटक दिंडोरी : प्रतिनिधी शहरातील आश्रय लॉज च्या…
नाशिक: प्रतिनिधी महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी…