येवला नगरपालिका कर्मचारी लाच घेताना जाळ्यात

येवला नगरपालिका कर्मचारी लाच घेताना जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
पडीक असलेल्या जागेची तात्पुरती बिनशेती परवानगी मिळून देण्यासाठी 20 हजारांची लाच स्वीकारताना येवला नगरपालिकेतील नगरविकास विभागातील कंत्राटी कर्मचारी आकाश रवींद्र गायकवाड वय22, रा.गवंडगाव याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांची येवला येथे समाजाची जागा आहे. या जागेसाठी बिनशेतीची परवानगी मुख्याधिकारी व लिपिक यांच्याकडून करून देण्यासाठी आकाश गायकवाड याने अगोदर 10 हजार रुपये घेतले होते आज आणखी20 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, राजेंद्र सानप, हवालदार प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, किरण धुळे, विलास निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *