माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवार यांची भेट
राजकीय भूकंप होण्याची शक्यता?
पळसे: सुनील पवार
शिवसेनेत चाळीस वर्ष ज्यांनी खडतर प्रवासात घातली आणि शिवसेनेचे पाळेमुळे तळागाळातील नागरिकां पर्यत पोहचवले असे राज्याचे माजीमंत्री बनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी उपनेते पदाचा दिलेला राजीनामा आणि त्यानंतर उदभवलेली राजकीय परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करत काल शिवाजी पार्क, मुंबई येथील शिवसेनाप्रमुखांचे स्मृतीस्थळी चर्मकार समाजातील घोलपांचे नतमस्तक झालेले समर्थक यामुळे सर्वच राजकीय वर्तुळात झालेली उलथापालथ आणि अचानक पणे व अनपेक्षित त्याच घोलप कुंटूंबातील अजून एक सदस्य म्हणजेच त्याचे सुपुत्र व देवळालीचे माजी आमदार योगेश बबनराव घोलप यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वे खासदार शरदराव पवार याची मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मधे सदिच्छा भेट घेतल्याने देवळालीत राजकीय भुकंप होतो की काय असा उलट सुलट चर्चेला उधाण आले असले तरी योगेश घोलप यांनी केवळ महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते व एक वडीलधारी आणि अभ्यासू नेते म्हणून पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली माझी अनेक दिवसांची भेटीची इच्छा आज पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. ,तथापि या भेटीमुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे, यावेळी समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, दिनेश धात्रक, उमेश खातळे, मनोज पालखेडे उपस्थित होते.