योगेश म्हस्के होणार शिवसेना जिल्हाप्रमुख?

शिंदे गटाशी एकनिष्ठ असल्याने चर्चा
नाशिक; अमोल सोनवणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून शिवसेनेच्या विविध पदाची नियुक्ती करण्यात येणार  आहेत . नाशिक जिल्ह्यातून मुख्यमंत्री राज्यभरात दौऱ्यास सुरुवात करणार आहेत. यामुळे मुख्यमंत्री  नाशिक दौऱ्यात कोण कोणत्या घोषणा करतात . याकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील एकमेव एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले योगेश म्हस्के यांची जिल्हाअध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वयाच्या 22 व्या वर्षी योगेश म्हस्के यानी उपसरपंच पदा पासून राजकारणात सुरुवात केली. यानंतर
भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख, शिव संग्राम उपजिल्हा प्रमुख, शिवसेना वाहतूक जिल्हाप्रमुख आदी विविध पदी काम केले . यानंतर
खासदार हेमंत गोडसे यानी खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कडे वैद्यकीय कक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली . यानंतर खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानव्ये कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी वैद्यकीय कक्षाच्या जिल्हा समनव्यक पदी नियुक्ती केली. यासाठी प्रभाकर काळे व नितीन लालसरे यांनी मध्यस्थी केली होती.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष, डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन , सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशन व कक्ष प्रमुख मंगेश चिवटे याच्या माध्यमातून योगेश म्हस्के यांनी जिल्हाभरात हजारो नागरिकांना रुग्ण सेवा उपलब्ध करून दिली. कोरोना काळात देखील रुग्णाना बेड उपलब्ध करून देणे , आक्सिजन ,रक्त पुरवठा , औषध उपलब्ध करून देन्याचे महत्व पूर्वक काम करण्यात आली. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रा द्वारे ९ कोटी रुपया हुन अधिक हॉस्पिटल च्या बिला मध्ये सवलत उपलब्ध करून देण्यात आली. कोविड काळात ९२५ रुग्णा बेड उपलब्ध करून देण्यात आली.१५२ शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आल्या. त्याच प्रमाणे ठिक ठिकाणी रक्तदान, आरोग्य शिबीर घेण्यात आली. मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली रुग्णवाहिका रुग्णांना 24 तास फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत. कार्यालयात 24 तासांत हेल्पलाईन नंबर द्वारे रुग्ण सेवेचे काम सुरू आहेत.त्याच प्रमाणे प्रभाग २३ सध्याचा प्रभाग २७ मधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी साठी 200 पेक्षा अधिक स्वखर्चातुन सीसीटीव्ही लावण्यात आले. जतु नाशक व धूर औषध फवारणी, रस्ताची दुरुस्ती ,पथदीप , मोकाट जनावरे आदीसह नागरिकाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येते. शहरातील नागरिकांच्या आरोग्या समस्या बरोबर इतर समस्या सोडवण्याचे काम योगेश म्हस्के हे करतात . एकनाथ शिदे यांनी ५० आमदारांना घेऊन बंड पुकारला तेव्हा जिल्हात एकमेव शिंदे समर्थक म्हणून शहरभरात शिंदे साहेबाचा सार्थ अभिमान जाहीर पाठींबा असल्याचे बॅनर लावण्यात आले होते. यानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर शहरात मोठा जल्लोष उत्सव म्हस्के यांनी साजरा केला. खासदार हेमंत गोडसे हे शिंदे गटात सामील झाल्याने मोठे शक्ती प्रदर्शन म्हस्के यांनी केले. त्याच प्रमाणे हरसूल येथील सावरपाडा येथे पुराच्या पाण्याने पूल वाहून गेल्याने मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे विशेष कार्यकरी अधिकारी मंगेश चिवटे व योगेश म्हस्के यांनी पाहणी करत. लवकरच सदर पूल बांधण्यात येणार असल्याचे आदेश मुख्यमंत्री महोदय यांनी दिले आहे. योगेश म्हस्के हे जिल्हाभरा सह उत्तर महाराष्ट्र देखील वैद्यकीय कक्षाचे काम करत आहेत. जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 10 वर्षा पेक्षा अधिक काळा पासून एकनिष्ठ असलेले योगेश म्हस्के यांच्या गळात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यादि जिल्हा दौऱ्यावर येत असल्याने काय घोषणा करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले

दारूच्या नशेत पतीने पत्नीला पेटवले महिला गंभीर जखमी; सातपूरची घटना सातपूर : प्रतिनिधी सातपूर नाशिक…

12 hours ago

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली

स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…

1 day ago

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी

नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…

1 day ago

पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार

बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार   नाशिक :प्रतिनिधी…

7 days ago

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक

विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…

7 days ago

मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर

संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा " मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती…

7 days ago