नाशिकमध्ये दोन दिवसीय राज्यस्तरीय योगोत्सव

१० व ११ डिसेंबर योग साधकांचा मेळा : ७०० पेक्षा अधिक साधकांची उपस्थिती
नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्यावतीने पहिल्या राज्यस्तरीय ‘योगोत्सव २०२२’चे आयोजन केले आहे. १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी पंचवटी, तपोवन येथील जनार्दन स्वामीच्या मठात डॉ. मनोज निल पवार यांच्या प्रेरणेतून हे संमेलन होणार आहे. या संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील ७०० पेक्षा अधिक साधक उपस्थित राहणार आहेत. योगाचा प्रचार व प्रसारच्या हेतूने प्रथमच अशाप्रकारचे राज्यस्तरीय संमेलन होणार असल्याची माहिती संमेलनाध्यक्ष योगाचार्य अशोक पाटील व स्वागताध्यक्ष डॉ. विशाल जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
योगाच्या शास्त्रीय ज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, जास्तीत जास्त योगशिक्षक तयार व्हावेत, समाजामध्ये आरोग्यासंबंधी जाणीव जागृती निर्माण व्हावी, योगशिक्षकांच्या अडीअडचणी शासन दरबारी पोहोचवून त्यांचे निराकरण व्हावे या बहुविध  उद्देशाने हा मेळावा घेण्यात येत आहे. यामध्ये तज्ज्ञांची व्याख्याने, योगाशी संबंधित प्रात्यक्षिके, संशोधनपर निबंध, संगीत रजनी या दोन दिवसात भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. या योगोत्सवाचे उद्धघाटन योग गुरु डॉ. विश्वासराव मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. प्रज्ञा पाटील या संमेलनाच्या ब्रँड अँबेसेडर आहेत. या सर्व कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या समित्या गठित करण्यात आल्या आहेत. राज्य नियोजन समितीचे अध्यक्ष राहुल येवला, डॉ. तस्मिना शेख, जीवराम गावले, प्रसाद कुलकर्णी, डॉ. प्रीति त्रिवेदी आदी मंडळी समित्यांच्या माध्यमातून संमेलन यशस्वतीची जबाबदारी पार पाडत आहेत.
या सर्व कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्याच्या महासचिव गीता कुलकर्णी, शर्मिला डोंगरे, सीमा ठाकरे, मंदार भागवत, दिपाली लामधाडे, सोनवणे, डॉ अंजली भालेराव, आश्विनी येवला, कल्पना भालेराव ,अनुष्का खळतकर   ,अर्चना दिघे, डॉ.वैशाली रामपूरकर, विजय सोनवणे, दिलीप राजगुरू, सुधीर पेठकर कविता कुलथे आदी सदस्य संमेलन यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. राज्य संघटनेचे महासचिव अमित मिश्रा, यवतमाळ जिल्ह्याचे शरद बजाज, वाशिम जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश पाटील, अमरावती विभाग प्रमुख चंद्रकांत अवचार, मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल, औरंगाबाद विभाग प्रमुख अंजली देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या संमेलनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री दादा भुसे यांना देखील निमंत्रित करण्यात आले असून, त्याबाबतची निमंत्रण पत्रिका त्यांना पाठविण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *