क्या खूब लगती हो.. बडी सुंदर दिखती हो!

लग्न ठरलेय म्हणून जिम, पार्लरकडे ओढा
नाशिक ः देवयानी सोनार
सध्या लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. लग्न अविस्मरणीय व्हावे असे प्रत्येक तरुण तरुणीला वाटते. लग्न हे सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र असल्याने सर्वाच्या नजरा,लग्नाचे फोटोज,व्हिडिओज मध्ये आपण सुंदर, फिट दिसावे यासाठी प्रयत्नशील असतात.त्यामुळे पार्लर,जीममध्ये जाऊन (इन्स्टंट) सुंदर  दिसण्याचे फॅड वाढले आहे.परंतु त्वरित सुडौल बांधा,चेहरा आणि आकर्षक शरीरयष्टी कमावणे महागात पडू शकते असे जाणकारांचे मत आहे.
विवाहोत्सुक मुलीं आणि तरुणांमध्ये फिट शरीरयष्टी दिसण्यसाठी जीम आणि पार्लर मध्ये जाऊन वजन कमी जास्त करणे,चेहरा केसांवर वेगवेगळे प्रयोग केले जात आहे.तीव्र डाएट करणे,अती व्यायाम करणे यामुळे शरीरावर आणि चेहर्‍यावर ग्लो येण्याऐवजी दुष्परिणाम होतात.त्यामुळे संतुलीत जीवनशैली अंगीकारल्यास लग्नावेळी आणि नंतरही वजनवाढ किंवा चेहर्‍यावरील ग्लो कमी होणार नाही असा डॉक्टर्स आणि जीम ट्रेनर यांनी सल्ला दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते अचानक उफाळून आलेलं हे जिमप्रेम तुम्हाला महागात पडू शकतं. लग्नाआधी अचानक जिमला जायला लागलं तर तुमच्या सांध्यांना इजा होऊ शकते. आणि यामुळे शरीर आणि मनाचा गोंधळ उडू शकतो.
लग्नाच्या आधी किमान 6 ते 8 आठवडे वर्कआऊट सुरू करतात.त्यासाठी ते कठोर मेहनत घेतात.  आणि त्यांच्या शरीरासाठी घातक ठरू शकते.  शरीराला एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीने करायची सवय लागलेली असते. अशात जर वजन कमी करण्यासाठी हार्डकोर ट्रेनिंग सुरू केले  तर पाठीचा कणा किंवा सांध्याच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. खूप जोराजोरात धावणे, एखादी एक्ससाईज रिपटेडली करणे यामुळे सांध्यांना त्रास होतो.  व्यायामामुळे पाठीच्या कण्यात, मानेवर, पायांच्या सांध्यांवर ताण येतो.अचानक मेदयुक्त आहार कमी केल्याने, कर्बोदके कमी केल्याने शरीराचे मोठे नुकसान होते.
काहींच्या मते आहार बदलला की वजन सुद्धा कमी होतं. डाएटिंग करून एक किंवा दोन महिन्यांत वजन कमी केले आणि पुन्हा आधीसारखंा आहार घेण्यास सुरुवात केली तर तुम्ही जे वजन कमी केलं होतं ते पुन्हा दुप्पट वाढू शकते.    जर नियमितपणे शरीराची हालचाल केली तर अवयव नीट काम करतील. ऊर्जा मिळेल, दिवसभर फ्रेश वाटेल. आणि ही सवय जर अंगवळणी पडली तर आनंदी आयुष्य जगाल. त्यामुळे लग्नातील आनंद कायम चेहर्‍यावर आणि शरीरावर परिणामकारक रहावा यासाठी संतुलीत जीवनशैली अंगीकारावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  जे लोक त्यांच्या लग्नाआधी जिममध्ये जातात ते लग्नानंतरच्या काळात काळजी घेणे सोडून देतात. पण वजन कमी करणे हे ध्येय न ठेवता तुमचे आरोग्य हे ध्येय असायला हवे. यामुळे तुमचे मन देखील निरोगी राहिल. यामुळे तुम्हाला व्यायाम आणि योग्य आहाराच्या सवयी लागण्यासाठी प्रेरणा मिळेल.
– डॉ.काजल पटणी

बारीक दिसण्यसाठी मुली लग्नाच्या आधी पंधरा ते वीस दिवस कडक डाएट करतात. त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात.जेवढ्या लवकर वजन कमी केले जाते तेवढे वजन जास्त वाढते.त्वचा,केसांवर वाईट परिणाम होतात.ज्या मुलामुलींचे लग्न ठरले आहे त्यंानी तीन ते चार महिने स्वतःची काळजी घेणे महत्वाचे आहे.डाएट,व्यायामाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सुरूवात करू शकतात. मुलांमध्येही मसल दाखवण्याचे ङ्गॅड आले आहे.अतिरिक्त प्रमाणात वजन उचलणे,क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे असे प्रक्रारामुळे दुखापत होवू शकते.ऐन वेळेवर जागे हेाण्यापेक्षा रोज डाएट आणि व्यायामाचा  सराव ठेवल्यास एकदम जड जाणार नाही.
– पूनम आचार्य(जीम ट्रेनर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *