नांदूर परिसरातील घटना
पंचवटी : वार्ताहर
दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते.
या दोघांवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी (दि.25) दुपारच्या सुमारास विद्यार्थिनीची प्राणज्योत मालवली. अनुष्का शांताराम निमसे असे तिचे नाव असून, ती नुकतीच दहावीची परीक्षा 92 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. तिच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर
कोसळला आहे.
शांताराम पुंडलिक निमसे (वय 43, रा. नांदूर, कमळवाडी, संभाजीनगर रोड) हे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच 15 बीआर 3545)वरून मुलगी अनुष्कासोबत गुरुवारी (दि.22) रोजी सायंकाळी कोणार्कनगर परिसरात किराणा माल खरेदीसाठी गेले होते, घरी परत येत असताना जत्रा चौक-नांदूर नाका लिंक रोडवरील बेंचमार्के बिल्डिंगसमोरून जात असताना मागून आलेल्या पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक मारली. धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन थांबले नाही. या वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे.
या धडकेत शांताराम निमसे व अनुष्का हे दोघे दुचाकीवरून खाली पडले. शांताराम निमसे यांच्या उजव्या खांद्याला, कमरेला व डोक्यास मार लागून दुखापत झाली.
मुलगी अनुष्काच्या डोक्यास, हातास आणि दोन्ही पायांना मार लागून गंभीर दुखापत झाली होती. दोघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना अनुष्काचा रविवारी मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई, वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी तिच्यावर नांदूर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारकरण्यात आले.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…