सातपूर पोलिसांनी केली सुटका
सिडको : विशेष प्रतिनिधी लग्नाच्या आमिषाने दोन लाख रुपये घेऊन 19 वर्षीय युवतीची विक्री करून बळजबरीने लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने संबंधित युवतीची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
कार्बन नाका, सातपूर येथील सपना बुगप्पा कानकुर्ते यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांची मुलगी कशिश राजू सोनवणे (वय 19) ही 27 फेब्रुवारी रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. दुसर्या दिवशी सकाळी तिने आईला दूरध्वनीवर संपर्क साधून नाशिकमधील राणी व भागी नावाच्या महिलांनी दोन लाख रुपये घेऊन तिची विक्री केल्याचे, तसेच नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे एका युवकासोबत जबरदस्तीने विवाह लावल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलीस तपासपथक तयार करून ते नांदगाव तालुक्यात रवाना करण्यात आले. पोलीस हवालदार दीपक खरपडे, महिला पोलीस अंमलदार वंदना पवार यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जातेगाव येथील नवनाथ शिरडकर यांच्या घरी संबंधित युवतीचा शोध लावला. दरम्यान, पोलीसपथक मुलीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना सुमारे 200 ते 300 नागरिकांनी घेराव घालत दोन लाख रुपये देऊन विवाह केल्याचा दावा केला व रक्कम परत मिळाल्याशिवाय मुलगी देणार नसल्याचे सांगितले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. स्थानिक पोलीस निरीक्षक भदाणे व नांदगाव पोलिसांच्या मदतीने युवतीची सुखरूप सुटका करण्यात आली. चौकशीदरम्यान युवतीने सांगितले की, इव्हेंटच्या कामाचे आमिष दाखवून तिला नाशिकहून मालेगाव येथे नेण्यात आले. तेथून पुढे चारचाकी वाहनाने जातेगाव येथे नेऊन तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आला. या युवतीला ताब्यात घेऊन नांदगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. पुढील तपास सातपूर पोलीस ठाणे करीत आहे. संबंधित आरोपी महिलांवर, तसेच इतर सहभागी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत.
Young woman sold for two lakhs for marriage
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…