लहान्याने मोठ्या भावाला संपवले; आईला दवाखान्यात नेण्यावरून वाद
पंचवटी : प्रतिनिधी
आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यावरून दोन भावामध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन खुनात झाले. यात लहान्या भावाने रागाच्या भरात मोठ्या भावाच्या छातीत व पोटात चाकूचे वार करून खून केल्याची हृदयद्रावक घटना आडगाव शिवारात घडली. संदीप विजय गायकवाड (वय ३३) असे मृताचे नाव आहे.
गायकवाड परिवार हा आडगाव येथील सद्भावना पोलीस हौसिंग सोसायटीत राहतात. बुधवारी दुपारी आई . किरण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे यावरून दोघे मुले संदिप (३३), अरविंद (३१) यांच्यात वाद झाला. त्यातून अरविंदने किचनमधील भाजी कापण्याच्या चाकूने संदीपच्या छातीत व पोटात वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या संदिपला तातडीने आडगाव मेडीकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतू तत्पूर्वीच निधन झाले होते. आडगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.