शितकड्यावरून  युवक -युवतीची आत्महत्या

शितकड्यावरून युवक युवतीची आत्महत्या

दिंडोरी : प्रतिनिधी
सप्तशृंग गडाच्या शितकड्या वरून उडी मारून युवती व युवकाने  आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली . या बाबत वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात सप्तशृंगगडाच्या दक्षिणेस असलेल्या शितकड्यावरून
युवती युवकाने उडी मारून आत्महत्या केली.दि.२६ मे २५ रोजी दुपारी २ते २.३० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.या बाबत ची खबर भातोडे येथील पोलीस पाटील विजय राऊत यांनी पोलीसांना माहिती वरून घटनास्थळ जाऊन पंचनामा केला मिळालेल्या माहिती नुसार दि.२६ मे २५ रोजी वणी येथील युवक अदित्य संजय देशमुख  तसेच फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ हिने  सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शितकड्या वरून दोघांनी आत्महत्या केली.वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची वेगवेगळया नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार मोनिका शिरसाठ  मिसींग असल्याची तक्रार नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात दि.२६मे २५रोजी केली होती.दोन्ही मृतदेह शीत कड्या जवळ  सापडले होते.मृतदेह कड्याच्या मध्यभागा पासुन खाली उतरून वणी  रुग्णालयात आणण्यात आले त्यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. प्रेमी युगुल असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *