शितकड्यावरून युवक युवतीची आत्महत्या
दिंडोरी : प्रतिनिधी
सप्तशृंग गडाच्या शितकड्या वरून उडी मारून युवती व युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली . या बाबत वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भातोडा शिवारात सप्तशृंगगडाच्या दक्षिणेस असलेल्या शितकड्यावरून
युवती युवकाने उडी मारून आत्महत्या केली.दि.२६ मे २५ रोजी दुपारी २ते २.३० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.या बाबत ची खबर भातोडे येथील पोलीस पाटील विजय राऊत यांनी पोलीसांना माहिती वरून घटनास्थळ जाऊन पंचनामा केला मिळालेल्या माहिती नुसार दि.२६ मे २५ रोजी वणी येथील युवक अदित्य संजय देशमुख तसेच फोपशी येथील मोनिका किसन शिरसाठ हिने सप्तशृंगी गडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शितकड्या वरून दोघांनी आत्महत्या केली.वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची वेगवेगळया नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहिती नुसार मोनिका शिरसाठ मिसींग असल्याची तक्रार नातेवाईकांनी वणी पोलीस ठाण्यात दि.२६मे २५रोजी केली होती.दोन्ही मृतदेह शीत कड्या जवळ सापडले होते.मृतदेह कड्याच्या मध्यभागा पासुन खाली उतरून वणी रुग्णालयात आणण्यात आले त्यांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. प्रेमी युगुल असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप केंद्रबिंदू या शहरात शहापूर/ साजिद शेख गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक-…
जव्हार( राजेवाडी )येथे गॅस्ट्रो साथीचे थैमान: दोन रुग्णांचा मृत्यू, 14 रुग्णांवर उपचार सुरू मोखाडा: …
आधी प्रेम... मग लिव्ह इन अन नंतर ... शहापूर/साजिद शेख २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील…
दिंडोरी येथील अपघातात सात ठार अपघातात तीन महिला, तीन पुरुष एक बालकाचा समावेश दिंडोरी…
साखरपुडा एकाशी, लग्न त्याच्याच मित्राशी प्रेमात धोका, स्टेटस ठेवले अन् पुढे घडले... सद्या प्रेमाची व्याख्याच…
नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले असून,…