स्वतःची गाडी पेटवित तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
सातपूर -त्रंबक रोडवर आयटीआय सिग्नल वर एका तरुणाने आपली दुचाकी जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली. मात्र वेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा आणि नागरिकांच्या सावधानतेने तरुणाला मागे खेचूल्याने तरुणाचा जीव वाचला. यावेळी दुचाकीचा सिग्नलवर भर रस्त्यात मोठा स्पोट होऊन आगीचा भडका उडाला.यात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती समजतात सातपूर पोलीस दाखल होऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे तसेच अग्निशमन विभागाने जळत असलेल्या आटोक्यात आणली. या घटनेमुळे सिग्नल वर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच बघणाऱ्यांची मोठी गर्दी देखील झाली होती