नाशिक : प्रतिनिधी
एम जी रोडवर मोबाइल कव्हर खरेदी केले नाही म्हणून मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास मारहाण केल्याची घटना आज बुधवार ( दि.24) दुपारच्या सुमारास घडली आहे. सदर घटनेेेची प्रत्यक्षदर्शीनी माहिती अशी की एक युवक मोबाइचे कव्हर खरेदी करण्यासाठी महात्मा गांधी रोडवरील एका दुकानात गेला.त्यावेळी त्यांनी काही कव्हर बघितले मात्र त्याला कव्हर न आवडल्याने तो दुकानाच्या बाहेर पडत असताना दुकानदाराने आमचा वेळ वाया गेला म्हणत कुरापत काढून युवकास मारहाण केली. वर्दळीचे ठिकाण असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर युवकाची सुटका झाली.