धक्कादायक: मोबाइल चोरीच्या संशयातून रेल्वेतून फेकल्याने तरुणाचा मृत्यू

मनमाड : आमिन शेख

मनमाड रेल्वे स्थानकावर मोबाईल चोर असल्याच्या संशयावरून सह प्रवाशाला मारहाण करून धावत्या रेल्वे गाडीतून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे यात रोहितकुमार मुकेश गोस्वामी (वय – 25) या युवकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अजयकुमार साहू रा.चेनपूरा मध्य प्रदेश यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की दिनांक .१५ फेब्रुवारी च्या रात्री साडे बारा वाजेच्या च्या दरम्यान मनमाड रेल्वे स्टेशन येथे पंजाब मेल रेल्वेगाडी उभी असताना त्यांच्या समोर गाडीत एका २५ ते ३० वर्षाच्या सडपातळ असलेला, रंगाने निमगोरा, अंगात बांधा हिरव्या निळ्या लाल रंगाच्या चौकटी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पैन्ट घातलेल्या, मराठी व हिंदी भाषा बोलत असलेल्या अनोळखी इसमाने मयत रोहीतकुमार मुकेश गोस्वामी याने मोबाईल चोरी केल्याचा आरोप करुन त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली अजय यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही शिवीगाळ केली आणि मयत रोहीत कुमार यांच्या वडील यांना फोनवर रोहीत यास रेल्वेतुन खाली फेकुन देण्याची धमकी देत रोहीतकुमार यास त्यांच्या जवळुन नेलेनंतर त्यास रेल्वेतुन बाहेर फेकून त्याचा मृत्यु घडवुन आणला असे सांगितले, अजयकुमार साहू यांच्या फिर्यादी वरून मनमाड पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि .डी .लांडगे करत आहे

मनमाड जंक्शन स्थानकात नेहमी घडतात घटना
मनमाड हे रेल्वेचे जंक्शन स्थानक असुन या स्थानकातून संपूर्ण भारतात रेल्वे जातात या माध्यमातून हजारो प्रवासी रोज ये जा करतात यातून अनेकदा छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत असतात मात्र यातून कधीही आशा प्रकारे घटना घडली नाही मात्र ही घटना घडल्याने सर्वाना आश्चर्य वाटत आहे या घटनेचा मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करत आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

प्रस्तावित रामवाडीतील पुलाला साइड ट्रॅक; निविदेतून वगळले

उर्वरित सव्वाशे कोटींच्या कामांना मात्र हिरवा कंदील नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने…

4 minutes ago

लाखलगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

रात्रीच्या वेळी घरांच्या कड्या वाजवून दहशत माडसांगवी : वार्ताहर लाखलगावसह परिसरात चोरांच्या दहशतीमुळे लाखलगावचे ग्रामस्थ…

12 minutes ago

लिव्ह इन रिलेशनशिप विवाहसंस्थेला पर्याय ठरू शकत नाही

लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…

32 minutes ago

अखेरच्या सोमवारी शिवभक्तांची गर्दी

नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…

45 minutes ago

विंचूर-गोंदेगाव रस्ताकामाला अखेर मुहूर्त!

रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…

57 minutes ago

मेळघाटातील महिलांना उद्योजकतेचे धडे; पारंपरिक कलाकुसरीला नवे कोंद

नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…

1 hour ago