थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर
निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
याबाबत लासलगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुपारी उगाव (ता.निफाड) येथील अनिकेत गोरख पानगव्हाणे हा हिरो होंडा शाईन या विनानंबरच्या मोटारसायकलवरून लासलगावकडून उगावकडे जात होता. यावेळी थेटाळे चौफुली नजीक त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक जोरात असल्याने डोक्यावरून चाक गेल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. लासलगाव पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन लासलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उत्तम गोसावी तपास करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *