ओझर : वार्ताहर येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेदरम्यान बुधवारी पारंपरिक बारागाड्या ओढण्याच्या सोहळ्यात किरण राजेंद्र कर्डक (वय 28, रा. श्रमिकनगर, ओझर) बारागाड्यांखाली येऊन जागीच ठार झाला. यात्रेत बारागाड्या ओढण्याच्या विधीला सुरुवात झाल्यानंतर अचानक झालेल्या या अपघातामुळे यात्रेच्या परिसरात एकच खळबळ उडाली. कर्डक यांच्या मृत्यूचे वृत्त कळताच शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस त्वरित दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.