अंबडला विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील दातीर चाळ परिसरात रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडून 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. 19) रात्री उशिरा घडली. त्याच्यासोबत असलेला मित्र मात्र स्थानिकांच्या वेळीच केलेल्या मदतीमुळे बचावला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
या प्रकरणी अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकेश मिथलेश सिंग आणि त्याचा मित्र हे दोघे अंधार्‍या रस्त्याने जात असताना दातीर चाळ परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने दोघेपण तोल जाऊन खाली पडले. विहिरीत पडताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले.
नागरिकांच्या प्रयत्नांमुळे एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, निकेश सिंग पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीत शिडीच्या सहाय्याने उतरून तसेच गळ टाकून शोधकार्य हाती घेण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतरही तो सापडला नव्हता. अखेरीस तो विहिरीच्या आतील कपारीत अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. जलपटू गोविंद तुपे यांच्या मदतीने दुपारी साडेचारच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मोहिमेत लीडिंग फायरमन अविनाश सोनवणे, मोईन शेख, वाहनचालक नंदू व्यवहारे, फायरमन शंतनू जोशी, यश वझरे आणि शुभम शेवाळे यांनी सहभाग घेतला. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

1 hour ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

1 hour ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

1 hour ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

1 hour ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

2 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

2 hours ago