मनमाड : आमिन शेख
आज नांदगाव तालुक्यात विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली मनमाड नजीक असलेल्या खादगाव येथे ४.०० वाजेच्या सुमारास वीज पडून शेतमजूर असलेला विलास जंगलू गायकवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने सर्व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आह आज दुपारी अचानक पावसाचे वातावरण झाले व विजांच्या कडकडाट सह जोरदार पावसाला सुरवात झाली यावेळी आपल्या घराकडे परतत असताना शेतमजुर विलास जंगलु गायकवाड वय २९ वर्ष याच्यावर वीज कोसळली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहितीउ मिळताच सबंधित ठिकाणी खादगावचे पोलिस पाटील यांना घटनास्थळी बोलवुन घेतले, पोलिस पाटील यांनी मनमाड पोलिस ठाण्यात कळवले व तहसीलदार स यांना ही माहिती दिली घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी घटनास्थळी येऊन यांनी पाहणी केली व मयत कुटुंबीयांचे सांत्वन केले व अपघात विमा म्हणून मयत कुटुंबीयांस सरकार कडून ४ लाख रुपये मिळवून देण्या संदर्भात माहिती दिली. जंगलू गायकवाड यांना दीड वर्षाचा लहान मुलगा व तीन महिन्याची मुलगी व म्हातारे आई बाप आहेत आजच्या या घटनेने नांदगाव तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…