निफाडला बी एस एन एल टॉवरवर युवकाची शोलेगिरी
निफाड। प्रतिनिधी
निफाड शहरालगत जळगांव फाट्या जवळ असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडच्या उंच टॉवर वर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक युवक चढलेला आहे सर्वात उंच ठिकाणावर गेल्या एक दीड तासापासुन तो थांबुन आहे त्याला बघण्यासाठी गर्दी वाढल्याने नाशिक संभाजीनगर मार्गावर जळगांव फाट्यालगत वाहतुक कोंडी होत आहे
प्रशासनाचीदेखील तारांबळ उडाली आहे पिंपळगांव बसवंत येथील अग्नीशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे बादल विष्णु भगरे असे अठरा वर्षीय युवकाचे नाव आहे.