नाशिक: प्रतिनिधी
नाशिकरोड येथे एका युवकाचा दगड टाकून तसेच धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सिन्नर फाटा स्टेशनवाडी येथील नवले कॉलनी रोडवर अजय भंडारी नामक युवकाचा मृतदेह आढळून आला, त्याच्या मृतदेहाजवल दगड पडलेलं होते, तसेच हातावर वार असल्याचे समजते, जवळच ऍक्टिवा दुचाकी देखील आढळून आली आहे, शिवजयंती काल साजरी झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.