नाशिक,: प्रतिनिधी
शहरात गुन्हेगारी ने कळस गाठला आहे. दररोज हाणामाऱ्या, तोडफोड, टवाळखोर यांचा हैदोस सुरू असतानाच खुनाच्या घटनाही सातत्याने घडत आहे, काल रात्री म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षाचालक तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली . प्रशांत अशोक तोडकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुण शनिवारी दिवसभर घरी होता, शनिवारीरात्री तो मित्रांसोबत बाहेर गेला होता, खून कशामुळे झाला याचे कारण गुलदस्त्यात आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.