येवला : तालुक्यातील एरंडगाव शिवारातील विहिरीत पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सतीश रामकृष्ण जाधव (वय 22) असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. आपल्या मित्राचा कार्यक्रम आवरून घरी परतत असताना दुचाकी विहिरीच्या कठड्याला धडकून विहिरीत युवक सतीश जाधव पडला असता त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अचानक झालेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याच विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याच्या दोन ते तीन घटना आतापर्यंत झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.youth