दिंडोरी : प्रतिनिधी
करंजवण धरणात पोहण्यासाठी गेलेल्या करंजवण येथील साई संदिप मोरे (16) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. करंजवण येथील नुकतेच इयत्ता दहावीची परीक्षा दिलेला शालेय विद्यार्थी साई संदिप मोरे हा करंजवण धरणात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. स्थनिक नागरिकाच्या मदतीने सुमारे अडीच तासाने बुडालेल्या साईला बाहेर काढण्यात यश आले आहे. उन्हाळा असल्याने दुपारच्या सुमारास परिसरातील अनेक युवक आंघोळीसाठी धरणावर आले होते.जास्त गर्दी असल्याने साई पाण्यात बुडाला ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. उशिराने लक्षात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…