उत्तर महाराष्ट्र

लासलगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

लासलगाव प्रतिनिधी

लासलगाव येथील नंदावननगर परिसरात नातेवाईकाकडे आलेल्या वालेकर वाडी पिप्री चिंचवड जि पुणे येथील ३१ वर्षीय युवकाने घराच्या छताला असलेल्या पंख्यास दोर लावून गळफास घेतल्याची घटना सोमवारी घडली.या बाबत लासलगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स पो नि राहुल वाघ करत आहे या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ शिवाजी सोनवणे रा.नंदावननगर लासलगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत गोविंद ज्ञानेश्वर रामटेक वय 31 रा वालेकर वाडी पिप्रि चिचंवड जि पुणे हे फिर्यादी चे मावस भाऊ असून फिर्यादी यांच्या घरी आले होते.या बाबत ची माहिती फोन द्वारे फिर्यादीने मयत गोविंद रामटेक यांच्या घरच्यांना कळवली असता मयताचे घरातील सदस्य त्यांना घेण्यासाठी लासलगाव येथे फिर्यादीच्या घरी आले.चहापाणी झाल्यानंतर मयत गोविंद रामटेक फिर्यादीच्या घरच्या वरच्या मजल्यावर रहात होते त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्य त्यांना घेण्यासाठी गेले असता खोलीचा दरवाजा बंद दिसला म्हणून दरवाज्यातील फटीतून बघितल्यावर गोविंद रामटेक हे सोमवारी छताला असलेल्या पंख्यास दोर लावून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले त्यानंतर दरवाजा तोडुन सर्वांनी आतमध्ये प्रवेश करून मयतास खाली उतरवून बरेच प्रयत्न केले परंतु मयत काही हालचाल करत नसुन त्याचा शात्सोश्वास बंद पडलेला होता.मयत गोविंद रामटेक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे त्यांच्या घरच्या सदस्यांनी या वेळी सांगितले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक वाडीलाल जाधव करत आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा शोध सुरू

शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…

21 hours ago

जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…

21 hours ago

‘पैस’मधील आध्यात्मिक आणि जीवनविषयक शिक्षण

र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…

21 hours ago

कांदेनवमी ः एक विलक्षण खाद्ययोग

षाढातील कोसळणार्‍या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्‍या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…

21 hours ago

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला; गोदावरीच्या पातळीत वाढ

नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…

21 hours ago

माजी नगरसेवक गिते, बोडके, दिवे, ताजणे भाजपमध्ये

शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…

21 hours ago