मुलीच्या प्रकरणावरून युवकाचे अपहरण करून मारहाण

मुलीच्या प्रकरणावरून युवकाचे अपहरण करून मारहाण

लासलगाव प्रतिनिधी

आठ दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सहा ते सात जणांच्या टोळीने एका युवकास मारहाण केल्याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे.

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील घटनेतील फिर्यादी अनिल दिनकर माळी वय २१ वर्ष रा .शिरसाणे ता चांदवड,हल्ली रा हनुमानवाडी, देवगांव फाटा यांचे व आरोपी गणेश दगु माळी,रा.नगरसुल तालुका येवला यांचे मागील आठ दिवसापूर्वी मुलीच्या प्रकरणावरून फिर्यादी यांच्या घराजवळ वाद झालेले होते.त्याचा मनात राग घरुन आरोपी गणेश दगु माळी याने त्याच्या जवळील नवीन सिमकार्डने फिर्यादीस मुलीचे नांवाने व्हॉटसअप वर चॅटींग करुन मुलगी आहे असे भासवून अनिल दिनकर माळी यास लासलगाव बस स्थानकावर भेटण्यास बोलविले.या वेळी आरोपी गणेश दगु माळी व त्याचे साथीदार ओम्नी कार मधून या ठिकाणी आले व फिर्यादीस मुलीचे नांव का घेतो असे म्हणत शिवीगाळ,दमबाजी करत बळजबरीने आरोपीच्या ओम्नी कार गाडीमध्ये बसुन साईबाबा नगर येथे घेवून जात त्याठिकाणी आरोपी गणेश दगु माळी याने फिर्यादीस सांगितले की तु मला तुझ्या घरी मारले होते.मीच तुला मुलीच्या नांवाने व्हॉटसअप वर चॅटींग करुन बोलवुन घेतले असुन तुला जास्त माज आला आहे का ? तुला दाखवतो असे म्हणत गाडीमध्ये असलेल्या लोखंडी गजाने व उर्वरीत आरोपींनी लाथाबुक्यांनी फिर्यादीस मारहाण करुन दुखापत करून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व आरोपी गणेश माळी (रा. नगरसूल, येवला), सौरभ ठाकरे (रा.नगरसूल, येवला), विशाल पवार (रा.नगरसूल येवला), विठ्ठल गवळी (रा. पिंपळगाव नजीक निफाड) यांना ताब्यात घेतले असून रविंद्र पवार (रा. नगरसूल, येवला), शंकर माळी (रा. नगरसूल, येवला) व विठ्ठल गवळी याचा साथीदार अद्यापही फरार आहेत.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मारुती सुरासे व पोलिस कर्मचारी तपास करीत असून येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि हवालदार दौलत ठोंबरे यांनी मोलाची मदत केली. याप्रकरणी फरार तिघांचा लासलगाव पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *