हातपाय धुण्यासाठी गेलेला तरुण बुडाला
इंदिरानगर| वार्ताहर |
वालदेवी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना हातपाय धुण्यासाठी गेलेला तरुण वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. जिल्हा आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह वडनेर दुमाला येथे पाण्यात सापडला
शुक्रवार ( दि. १८ ) रोजी विजय गणपत गारे( वय 22 वर्षे) व राहुल सुरेश घुगे (वय 24 वर्षे )दोघे रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, हे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पुलावर हात पाय धुण्यासाठी गेले असता पुलावरील शेवळामुळे पाय घसरून नदीच्या पाण्यात पडून बुडून वाहून गेले होते. त्यातील राहुल याला पोहता येत असल्याने तो पोहत किनारी आला होता. मात्र विजय पाण्यात बेपत्ता झाला होता.
उपनिवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकांत श्रीकृष्ण देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन पथकाने त्या व्यक्तीला शोधण्याची शोध मोहीम सुरू ठेवली होती . या पथकाच्या अथक प्रयत्नानंतर सदर तरुण पाण्यात सापडला .
या शोध मोहिमेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे जॉन भालेकर,मनोज कनोजिया ,मंगेश केदारे, राहुल बोराडे, विशाल चौधरी, पराग कुलकर्णी, प्रवीण काळे ,पंडित भगवान, ,संकेत नेरकर, दीपक पाटील यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून निस्वार्थपणे सेवा करून या तरुणाचा शोध घेतला.
यावेळी तलाठी विभागाचे नवले तसेच उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भालेराव , पोलीस उपनिरीक्षक कोकाटे, पोलीस नाईक होलगीर, अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते .
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…