सिन्नर। प्रतिनिधी
तालुक्यातील खंबाळे येथे शेततळ्यात बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना काल (दि.29) सकाळी 7.30 ते 8 वाजेच्या दरम्यान घडली. सोनल भाऊसाहेब आंधळे (24) रा. खंबाळे, ता. सिन्नर असे मृत तरुणीचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खंबाळे येथे भाऊसाहेब किसन आंधळे हे पत्नी मंदाकिनी, मुलगा विशाल व मुलगी सोनल यांच्यासह वास्तव्यास असून शेती करतात. त्यांचे गट नं. 479 मध्ये शेततळे असून काल सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब आंधळे व मुलगी सोनल हे दोघे शेतावर शेततळ्यात पाणी किती आहे हे पाहण्यासाठी गेले होते. शेततळ्यातील पाणी पाहिल्यानंतर मुलगी सोनलने वडिलांना सांगितले तुम्ही घरी जा, मी थोडावेळ थांबते असे म्हटल्याने वडिल भाऊसाहेब घरी आंधोळ करण्यासाठी निघून आले. त्यानंतर अर्धातास होऊनही मुलगी सोनल घरी न परतल्याने भाऊसाहेब यांनी पुन्हा शेतात जाऊन पाहिले असता ती तेथे दिसली नाही. त्यामुळे भाऊसाहेब यांनी आजूबाजुला शोध घेतला तसेच शेततळ्यावर जाऊन पाहिले असता मुलगी सोनल शेततळ्यात बुडाल्याचे दिसून आले.
प्रेम प्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या
भाऊसाहेब आंधळे यांनी आजूबाजूच्या शेतकर्यांना मदतीसाठी बोलावले असता नामदेव रामनाथ आंधळे, प्रविण विलास आंधळे यांनी धाव घेत शेततळ्यात उतरुन सोनलला पाण्याबाहेर काढले व खासगी वाहनातून दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले असता उपचारादरम्यान सोनलचा मृत्यू झाला. वडील भाऊसाहेब आंधळे यांनी नांदूरशिंगोटे पोलिस दूरक्षेत्रात जाऊन घटनेची माहिती दिली. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जयंत पाटील अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष नाशिकरोड : प्रतिनिधी राष्ट्रवादी…
नाशिक प्रतिनिधी नाशिक जिल्हा परिषदेमधील एका वरिष्ठ विभागप्रमुखावर तब्बल ३० महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाच्या तक्रारी…
ईशान अमेय खोपकरचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण! ‘येरे येरे पैसा ३’ मधील ‘उडत गेला सोन्या’ हे…
मासिक पाळी तपासण्यासाठी विद्यार्थिनींसोबत केले असे काही... कुठे घडला नेमका हा प्रकार? शहापूर : प्रतिनिधी…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…