.मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी बचावले
इंदिरानगर| बाबा खरोटे
येथील सुदर्शन मंगल कार्यालय समोर असलेले जुने गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. या घटनेत मनपा पूर्व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी बालमबाल बचावले. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
काही महिन्यांपूर्वी लेखा नगर येथे दुचाकीवरून जाणाऱ्या युवकावर गुलमोराचे झाड पडले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. तसेच मुंबई नाक्यावर एका वाहनावर झाड गुलमोराचेच झाड कोसळल्याने वाहनाचे प्रचंड नुकसान झाले होते. इंदिरानगर येथे देखील गुलमोहराचेच झाड कोसळले. शहरात या घटना वारंवार घडत आहेत.
भागात पूर्व विभागाचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी रोजच्या प्रमाणे ड्युटी करत होते. मंगल कार्यालयात लग्नविधी असल्याने रस्त्यावर गाड्या उभ्या होत्या. तसेच शेजारीच असलेल्या टपरी वर चहा पिणाऱ्याच्या देखील गाड्या उभ्या होत्या. त्या काढण्याच्या सूचना देण्यासाठी गुलमोहराच्या झाडाजवळ अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लावली. एक कर्मचारी ध्वनिक्षेपकावरून गाड्या काढण्यासाठी सूचना देत होते तर इतर कर्मचारी गाडीच्या खाली उतरून रस्त्यावर उभे असणारे वाहने काढण्यासाठी नागरिकांना सांगत होते. याचवेळी गाडी जवळ अचानक गुलमोराचे झाड खाली कोसळले. मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.
या घटनेचे माहिती कळताच माजी नगरसेवक अॅड . शाम बडोदे तसेच त्यांचे कार्यकर्ते राम बडोदे, सुमित मोरे संदीप असोले तसेच नागरी समस्या निवारण समितीचे अध्यक्ष संदीप जगताप, वसंत आव्हाड इतर नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच अग्निशमन दलाला कळवले. गणेश चौक येथील वीज वितरण कंपनीचे संतोष धारराव, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाचे सुनील घुगे, अविनाश सोनवणे, कांतीलाल पवार, सोमनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. कटरच्या साह्याने पडलेले झाड तोडण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
गुलमोहराचे झाड पडण्याच्या घटना शहरात वारंवार होत आहेत. शहरांमध्ये जुनी असलेले सर्वच झाडे मनपाने तपासून त्याचे उत्खनन करून दुसऱ्या ठिकाणी लावावे. त्याच्या बदल्यात दीर्घायु असलेले झाडे लावावे, जेणेकरून शहराला ऑक्सिजन मिळेल व अशा दुर्घटना घडणार नाहीत.
– संदीप जगझाप, नागरिक समस्या निवारण समिती
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…
रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…