किल्ले दुर्ग भांडार

किल्ले दुर्ग भांडार

कुठे आहे : किल्ले दुर्ग भांडार हा किल्ला त्र्यंबकेश्‍वरजवळ आहे.

किल्लयाची माहिती: अनोख्या रचनेमुळे संस्मरणीय ठरणारा किल्ले दुर्ग भांडार, ब्रह्मगिरीचा किल्ला मध्ययुगीन काळापासून आपले महत्त्व राखून आहेत समुद्रसपाटीपासून 1295 मीटर4000फुट उंचीवर उभा असणारा हा दुर्ग ब्रह्मगिरी, त्र्यंबकेश्वरचा किल्ला अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. या गडाचे कातळातील प्रवेशद्वार, दारूगोळ्याचे कोठार,पडक्या वाड्याचे भग्नावशेष, जटाशंकर मंदिर, पंचलिंग पर्वत,महादेव मंदिर, गोदावरीचे उगमस्थान फार तर किल्ले हत्ती मेट पाहतात.
गंगाद्वारकडे जाणार्‍या पायर्‍यांचा मार्ग लागतो. त्या मार्गाने साधारण पंधरा मिनिटे चालल्यावर डावीकडे ब्रह्मगिरीकडे जाणारी वाट . या वाटेवर शिवकालीन पाण्याचे बाराव आहेत.दगडी पायर्यांनी चालत चालत ब्रह्मगिरी किल्ल्याचे कातळकोरीव प्रवेशद्वार लागतेया माथ्यावर दोन टाकी व मागील बाजूस दगडात कोरून काढलेला बुरुजआहे, येथून आपल्याला संपूर्ण पंचक्रोशीतील दर्शन होते, अगदी शेवटच्या टोकापर्यंत गड लढविता यावा म्हणून हे कातळकोरीव अभिनव बांधकाम केलेले असून, हा दुर्ग भांडारच्या शेवटचा बुरुज शत्रूवर तोफांची मारगिरी करण्यासाठी दगडात खोदून तयार करण्यात आलेला आहे.1 जानेवारी 1664 रोजी सुरत लुटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज येथे त्र्यंबक रायाचा अभिषेक करून पुढे सुरतला गेलेत त्यासंदर्भातील दुर्मिळ पत्रे आपल्याला त्र्यंबकेश्वर गावातील लोकमान्य मोफत वाचनालयात आपल्याला पाहावयास मिळतो.

कसे जाता येईल: नाशिकवरून त्र्यंबकेश्‍वरसाठी कोणत्याही वाहनाने जाता येईल. त्र्यंबकेश्‍वरजवळच दुर्ग भंडार किल्ला आहे.

 

शाम त्र्यंबकराव गव्हाणे
संपर्क 9011354954
शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्था महाराष्ट्र राज्य.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *